राज्यात तीन वर्षांत साथरोगाचे १७४३ बळी

Disease
Disease

सोलापूर - राज्याच्या आरोग्य विभागाने ठोस नियोजन करूनही मागील तीन वर्षांत साथरोगाने तब्बल एक हजार ७४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये या वर्षी सर्वाधिक २२३ मृत्यू स्वाइन फ्लूने; तर लेप्टो, उष्माघात, हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया, जपानी मेंदूज्वर, माकडतापाने २२ जण दगावल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. दुसरीकडे साथरोग व जलजन्य आजारांना थोपविण्यासाठी आरोग्य विभागाने कागदोपत्रीच ठोस नियोजन केल्याचे चित्र दिसते.

राज्यात यंदा बहुतांश तालुक्‍यांत पावसाची दडी, तर काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. बदलत्या वातावरणाचा फटका नागरिकांना बसला आणि स्वाइन फ्लू, लेप्टो, उष्माघात, हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया, जपानी मेंदूज्वर, माकडताप या साथरोगांसह कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, विषमज्वर अशा जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव राज्यभर दिसत आहे.

पावसाळ्यात सातत्याने पाऊस होत नसल्याने आणि पाणीटंचाईमुळे मोठ्या शहरांमध्ये पाच-सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्यानेही डेंगीचे डास वाढल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com