राज्यात २०० कैद्यांना मुक्ती

दीपा कदम
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मुंबई - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशभरात पहिल्या टप्प्यात चार हजारांहून अधिक कैद्यांना तुरुंगातून मुक्त केले जाणार आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातून वयोवृद्ध आणि ६६ टक्‍के शिक्षा भोगलेल्या २०० कैद्यांना शिक्षा पूर्ण होण्याच्या आधीच सोडले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या निकषांत बसणारी एकही महिला कैदी राज्याच्या तुरुंगात नाही.

केंद्राच्या निकषांनुसार सुटका करता येईल, अशा राज्यातील २०० पेक्षा अधिक कैद्यांची यादी राज्याने तयार केली होती. मात्र, ३०७ (अ) मध्ये गंभीर गुन्ह्याचा समावेश असल्याने त्या कैद्यांना मुक्‍त करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण गृह मंत्रालयाने राज्याला दिले आहे. गंभीर गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना मुक्‍त करता येणार नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील यादीत सुटकेसाठी २०० कैद्यांचा समावेश झाला आहे. निती आयोगाच्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गंभीर शिक्षा भोगत नसलेल्या कैद्यांना मुक्‍त करण्याची कल्पना सुचविली होती. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीनेही मान्यता दिली.

तीन टप्पे
 येत्या २ ऑक्‍टोबरला काही कैदी मुक्‍त.
 पुढील वर्षी १० एप्रिलला चंपारण्य सत्याग्रहाच्या स्मरणार्थ दुसऱ्या टप्प्यातील कैदी सुटणार.
 तिसऱ्या टप्प्यातील कैदी पुढील वर्षी गांधी जयंतीला मुक्‍त.

Web Title: 200 Prisoner free