मराठवाड्यात २२ टक्के कमी पाऊस

मराठवाड्यात २२ टक्के कमी पाऊस

पुणे - राज्यात मराठवाड्यामध्ये यंदा पावसाने पाठ फिरविल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या मॉन्सूनच्या विश्‍लेषणातून स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यात तेथील सरासरीपेक्षा २२ टक्के पाऊस कमी पडला, अशी माहिती खात्यातर्फे देण्यात आली. 

गेल्या चार महिन्यांमध्ये पडलेल्या मॉन्सूनच्या पावसाचा विश्‍लेषण अहवाल हवामान खात्याने नुकताच प्रसिद्ध केला. हवामान खात्याने जाहीर केलेल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाचा तुलनात्मक अभ्यासही यात करण्यात आला आहे. त्यातून मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. संपूर्ण देशात सरासरीच्या तुलनेत नऊ टक्के पाऊस कमी पडला. त्यातही एकट्या ईशान्य भारतामध्ये पावसाचे प्रमाण २४ टक्‍क्‍यांनी यंदा कमी राहिले.   यंदाच्या पावसाळ्यात फक्त मध्य भारत, देशाच्या वायव्येकडील भागात आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये समाधानकारक पाऊस पडला. 

राज्यात दुष्काळ
अमरावती ः राज्यात यंदा सरासरी ७८ टक्के पाऊस झाला; त्यामुळे पीकस्थिती भीषण असल्याचे वास्तव मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. तथापि, दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राने ठरवून दिलेले निकष पूर्ण करावे लागणार असल्याने राज्यात दुष्काळ जाहीर करण्यास डिसेंबर उजाडणार आहे. राज्यात ३१ ऑक्‍टोबरपर्यंत टंचाईची स्थिती जाहीर करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com