राज्यातील डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात, तब्बल २२१ डॉक्टर पॉझिटिव्ह

maharashtra doctors corona positive
maharashtra doctors corona positivee sakal

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या (Maharashtra Corona Cases) झपाट्याने वाढत आहे. त्यातच रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर कोरोना विळख्यात सापडत आहेत. आतापर्यंत मुंबईतील सर्वाधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण (Maharashtra Doctor Corona Positive) झाली असून जेजे रुग्णालयातील ५९ डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

maharashtra doctors corona positive
नेत्यांमध्ये संसर्ग वाढला... प्रवीण दरेकरांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले तेव्हापासून रुग्णवाढीचा वेग प्रचंड आहे. तीन पटीने रुग्ण वाढत असून तिसर्‍या लाटेचा हा प्रभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील 221 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील जेजे रुग्णालयात आतापर्यंत ५९ निवासी डॉक्टर्स कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर, पालिकेच्या केईएम रुग्णालयासह नायर रुग्णालयातील ही डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी पॉझिटिव्ह सापडत आहेत. याबाबत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टरचे अध्यक्ष डॉ. अविनाश माधव दहिफळे यांनी माहिती दिली आहे.

कोणत्या शहरात किती डॉक्टरांना लागण

  • मुंबई

  • जे. जे. रुग्णालय ५९

  • सायन रुग्णालय - ५०

  • नायर रुग्णालय - 40

  • केईम रुग्णालय -40

  • कूपर रुग्णालय - 7

  • ठाणे - 8

  • धुळे - 8

  • पुणे ससून रुग्णालय - 5

  • लातूर - 1

  • मिरज - 1

  • औरंगाबाद -1

  • नागपूर -1

दरम्यान, नायर रुग्णालयातील अॅकेडेमिक अधिष्ठाता यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यासह अनेक डॉक्टर्स आणि परिचारिका ही पॉझिटिव्ह आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com