राज्यात शिक्षकांची 24 हजार पदे रिक्त 

प्रशांत कांबळे 
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

मुंबई - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवण्यासाठी एक हजार शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले होते; मात्र अद्याप त्यांच्या जागी दुसऱ्या शिक्षकांची नियुक्तीच न झाल्याने राज्यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील 24 हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत, अशी धक्कादायक माहिती शिक्षण विभागातून मिळाली. 

राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि विभाग स्तरावरील शिक्षकांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, विद्या प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद या विभागातील विविध ठिकाणी प्रतिनियुक्ती देण्यात आली होती. त्यांच्या जागी दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश होते; मात्र अद्याप त्या नियुक्‍त्या झाल्या नाहीत; तसेच भरतीही झालेली नसल्याने इतर शिक्षकांचीही पदे रिक्त आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशिला चौधरी यांनी दिली. प्रतिनियुक्तीमुळे रिक्त झालेल्या पदांसह निवृत्तीनंतर रिक्त पदे सुमारे 32 हजारांहून अधिक आहेत. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक देण्याचे सरकारचे धोरण आहे; मात्र त्यावर अंमलबजावणी होत नाही. त्यात शिक्षकांना अतिरिक्त कामांत जुंपले जाते. विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयांच्या शिक्षकांची नऊ हजार पदे रिक्त आहेत, असे शिक्षक आमदार बळीराम पाटील यांनी सांगितले. 

Web Title: 24000 posts of teachers in the state are vacant