राज्यातील 25 रुसा प्रकल्पांचे उद्या होणार डिजिटल लॉंचिंग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019

मुंबई - राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान 2.0 (रुसा) या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून राज्यातील 25 रुसाअंतर्गत प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी 3.45 वाजता चर्चगेट येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. 

रुसाअंतर्गत वाशीम जिल्ह्यातील चिखली येथील नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय; तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ डिजिटल लॉंचिंगमार्फत मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे रुसाअंतर्गत राज्याला स्वायतत्ता मिळालेल्या 22 महाविद्यालयांचे डिजिटल लॉंचिंगही मोदी यांच्या हस्ते होईल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, राज्य सरकार आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून डिजिटल लॉंचिंगचा कार्यक्रम होणार आहे. 

शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी महाविद्यालयांना जागतिकीकरणाच्या वेगाबरोबर रोजगाराभिमुख नवनवीन अभ्यासक्रम संशोधन व विकास व नवोपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायतत्ता देण्याचे सरकारचे धोरण आहे. या संकल्पनेचा पुढील टप्पा म्हणून स्वायतत्ता प्रदान केलेल्या महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायतत्ता योग्यप्रकारे अमलात आणण्यासाठी भौतिक संरचना व पायाभूत सुविधांकरिता रुसाअंतर्गत आर्थिक साह्य देण्यात येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 launches of RUSA projects in the state tomorrow