
Crime News : मुंबईत देहव्यापारासाठी आणलेल्या 26 महिलांची सुटका..चार आरोपी अटकेत
मुंबई : मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने दक्षिण मुंबईतील ग्रँटरोड परिसरात एका घरात खास बांधलेल्या पोकळीत ठेवलेल्या तब्बल 26 महिलांची सुटका केली., या घरातून कथित देहव्यापाराचे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर महिलांसह चार जणांना अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विश्वसनीय माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने (एसएसबी) मंगळवारी रात्री ग्रँट रोडच्या लॅमिंग्टन रोड परिसरातील एका इमारतीमध्ये असलेल्या घरावर छापा टाकला. छाप्यादरम्यान, तीन महिलांसह चार जणांना पकडण्यात आले , परंतु त्यांचे दहा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.
परिसराची कसून झडती घेतल्यानंतर पोलिसांना आस्थापनात खास बांधलेली पोकळी सापडली जिथे 26 महिलांना ठेवण्यात आले होते.सुटका झाल्यानंतर महिलांनी विविध राज्यातून त्यांना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याना दिली.कारवाई नंतर अटक केलेल्या आरोपींना आणि सुटका केलेल्या महिलांना पुढील चौकशीसाठी डीबी मार्ग पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले