विलासरावांच्या हयातीतच का नाही बोललात - रितेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हयात असताना तुम्ही आरोप केले असते, तर त्याच वेळी आपणांस योग्य उत्तर दिले असते, असा टोला विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना लगावला. 

मुंबई - मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हयात असताना तुम्ही आरोप केले असते, तर त्याच वेळी आपणांस योग्य उत्तर दिले असते, असा टोला विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना लगावला. 

मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना विलासराव देशमुख हे पुत्र रितेश आणि चित्रपट दिग्दर्शक यांच्यासोबत त्या ठिकाणी गेले होते. विलासराव देशमुख यांनी आपल्या मुलाला चित्रपटांमध्ये भूमिका मिळावी, यासाठी २६/११ च्या हल्ल्याच्या वेळीही याच गोष्टीला महत्त्व दिले होते, असा आरोप गोयल यांनी पंजाब येथे प्रचारसभेत केला होता. त्यांच्या याच गंभीर आरोपावर रितेशने थेट त्यांना उत्तर दिले. 

गोयल यांच्या वक्तव्याविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत रितेशने ट्विट केले आहे. ‘हो. हे खरं आहे की मी ताज आणि ओबेरॉय या हॉटेलमध्ये गेलो होतो. पण, तुम्ही आरोप केल्याप्रमाणे हे अजिबातच खरे नाही की गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले होत असताना मी त्या ठिकाणी होतो. हो.. हे देखील खरे आहे की मी माझ्या वडिलांसोबत अनेक ठिकाणी गेलो. पण, हे अजिबात खरे नाही की त्यांनी कधीही चित्रपटांत मला भूमिका मिळाव्यात यासाठी कोणाकडे शिफारस केली होती. त्यांनी कधीच कोणत्याही निर्माता किंवा दिग्दर्शकाशी माझी चित्रपटात निवड करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी संपर्क साधला नाही आणि ते मी अभिमानाने सांगतो,’ असे रितेशने लिहिले आहे.

Web Title: 26/11 terror attacks in Mumbai case Riteish Deshmukh comment to Union Minister Piyush Goyal