राज्यातील 27 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 17 April 2018

मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी 27 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी 27 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पालघरच्या सहायक जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांची नवी मुंबईत पणन आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी जालनाचे जिल्हाधिकारी एस. आर. जोंधळे यांची नेमणूक झाली आहे. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांची विक्रीकर विभागाच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची नियुक्ती झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांची परिवहन आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महापालिका आयुक्तपदी बदली झाली आहे.

बदली झालेले अन्य अधिकारी (कंसात नव्या नियुक्‍त्या) -
विपीन शर्मा (महासंचालक, मेडा, पुणे),
विशाल सोलंकी (आयुक्त, शिक्षण, पुणे),
हृषीकेश यशोद (आयुक्त, राज्य कामगार विमा),
डॉ. निरुपमा डांगे (जिल्हाधिकारी, बुलडाणा),
माधवी खोडे-चावरे (आयुक्त, महिला आणि बालविकास, पुणे),
अश्‍विन मुदगल (जिल्हाधिकारी, नागपूर),
एम. जी. अर्दाड (व्यवस्थापकीय महासंचालक, महानंद),
डॉ. अभय महाजन (उपसचिव, पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग मंत्रालय),
सुनील चव्हाण (जिल्हाधिकारी, औरंगाबाद),
नवल किशोर राम (जिल्हाधिकारी, पुणे),
चंद्रकांत पुलकुंडवार (सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी),
एच. मोडक (अतिरिक्त आदिवासी आयुक्त, नागपूर),
रुचेश जयवंशी (अपंग कल्याण आयुक्त, पुणे),
संजय यादव (मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हा परिषद),
एल. एस. माळी (आयुक्त, नांदेड महापालिका),
राहुल द्विवेदी (जिल्हाधिकारी, नगर), एस. राममूर्ती (व्यवस्थापकीय संचालक, राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर),
पवनीत कौर (मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद जिल्हा परिषद)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 27 IAS officer transfer