महाराष्ट्रातील 28 खासदारांवर फौजदारी गुन्हे

 महाराष्ट्रातील 28 खासदारांवर फौजदारी गुन्हे

मुंबई ः लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण 48 खासदारांपैकी भाजपचे 23, शिवसेनेचे 18, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, कॉंग्रेस, "एमआयएम'चा एक व अपक्ष एक असे खासदार विजयी होऊन संसदेत पोचले आहेत. राज्यातील या 48 खासदारांमध्ये 28 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल असून, 15 खासदरांवर गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल आहेत. 

ही माहिती विजयी उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केली असून, "महाराष्ट्र इलेक्‍शन वॉट' आणि "असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थांनी या शपथपत्रांचे विश्‍लेषण केले आहे. खासदारांची आर्थिक पार्श्‍वभूमी विचारात घेता सर्व 48 उमेदवार गडगंज असल्याची माहितीही यातून समोर आली आहे. यात सर्वाधिक मालमत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनियुक्त खासदार उदयनराजे यांची आहे. शैक्षणिक गुणवत्तेच एक खासदार केवळ पाचवी शिकलेले, तर एक पीचएडीधारक असल्याचे दिसून आले. 

गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या खासदरांची संख्या 28 
फौजदारी गुन्हे 
15 गंभीर गुन्हे (खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा) 

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी (पक्षनिहाय) 
13 भाजप 
11 शिवसेना 
1 राष्ट्रवादी कॉंग्रेस 
1 कॉंग्रेस व एमआयएम 

गंभीर गुन्हे दाखल (पक्षनिहाय) 
6 भाजप 
5 शिवसेना 
1 राष्ट्रवादी कॉंग्रेस 
1 कॉंग्रेस व एमआयएम 

आर्थिक पार्श्‍वभूमी 48 कोट्यधीश खासदार 
23.04 कोटी रु सरासरी मालमत्ता 
50 कोटींपेक्षा जास्त पाच खासदार 

सर्वांत श्रीमंत उमेदवार (आकडे कोटी रुपयांत) 
199 कोटी उदयनराजे भोसले 
140 कोटी सुप्रिया सुळे 
127 कोटी रणजित नाईक निंबाळकर 
102 कोटी श्रीरंग बारणे 
62 कोटी सुनील मेंढे 

कर्ज अथवा देणी (कोटी रुपयांत) 
3.37 सरासरी देणी 
5.54 कोटी भाजप खासदार 
1.23 कोटी शिवसेना 
56 लाख रु. राष्ट्रवादी कॉंग्रेस 

शैक्षणिक पार्श्‍वभूमी 
1 पाचवी 
1 आठवी 
7 दहावी 
8 बारावी 
13 पदवी 
5 व्यावसायिक पदवी 
7 पदव्युत्तर 
1 पीएचडी 
5 इतर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com