राज्यात अवैध दारूच्या 298 तक्रारी दाखल 

राज्यात अवैध दारूच्या 298 तक्रारी दाखल 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अवैध दारूसंदर्भात ऑनलाईन पद्धतीने राज्यातून 298 तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये अवैध दारूविक्री; तसेच हातभट्टी दारूच्या तक्रारी सर्वांत जास्त असून, त्यापैकी 140 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे; तर 108 तक्रारींवर अद्याप कारवाई सुरू आहे. विशेष म्हणजे टपालाद्वारेही 10 ते 20 टक्के तक्रारी आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले. 

निवडणुकीच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधिक काटेकोरपणे कारवाई करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी 24 तास टोल फ्री क्रमांकावर अधिकारी उपलब्ध राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ऑनलाईन आणि व्हॉटस्‌ऍप किंवा "आपले सरकार' पोर्टलवर आलेल्या तक्रारी कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवल्या जात आहेत. त्यामध्ये 11 मार्च ते 22 एप्रिलपर्यंत सुमारे 298 तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे 10 ते 20 टक्के तक्रारी पोस्टाद्वारेही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठवण्यात आल्या आहेत. 

अवैध पद्धतीने कुठेही दारूची विक्री होऊ नये, मतदारांना प्रलोभन देण्यासाठी दारूचा वापर होऊ नये यासाठी टोल फ्री क्रमांक आणि व्हॉटस्‌ऍप नंबर देण्यात आला आहे. त्याद्वारे येणाऱ्या तक्रारींमुळे विविध ठिकाणी कारवाई करणे सोपे झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. 

अवैध दारूची विक्री होत असल्यास किंवा दारूच्या माध्यमातून मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रकार सुरू असल्यास नागरिकांनी तक्रार करावी. तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. ऑनलाईन सेवा, टोल फ्री क्रमांक आणि व्हॉटस्‌ऍप नंबरही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेबसाईटवर देण्यात आला आहे. अशा तक्रारींसाठी 24 तास टोल फ्री क्रमांकाची सेवा नागरिकांसाठी सुरू राहणार आहे. 
- प्राजक्ता लवंगरे वर्मा, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क 

विभागवार तक्रारींची संख्या 
नागपूर - 55 
ठाणे- 96 
पुणे- 46 
नाशिक- 35 
औरंगाबाद- 39 
कोल्हापूर- 27 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com