Malegaon Bomb Blast: मालेगाव स्फोटातील २९वा साक्षीदारही फितूर; काय आहे कारण?

Malegaon Bomb Blast 2008
Malegaon Bomb Blast 2008esakal

मुंबईः २००८मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील २९वा साक्षीदारही फितूर झाला आहे. यापूर्वी २८ आरोपी फितूर झालेले आहेत.

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता तर १०० जण जखमी झाले होते. आज फितूर झालेला आरोपी हा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित या आरोपींशी संबंधित होता. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

हेही वाचाः Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

या प्रकरणाचा तपास 'एटीएस'कडून राष्ट्रीय तपास संस्था 'एनआयए'कडे गेला आहे. यापूर्वीच्या साक्षीदारांनी आपल्याला काहीच आठवत नसल्याचं कोर्टामध्ये सांगितलं होतं. त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे काय होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Malegaon Bomb Blast 2008
World Population: 'त्या' बाळाच्या जन्मामुळे जगाची लोकसंख्या 800 कोटी झालीय

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजनंतर मशिदीत मोटारसायकलच्या माध्यमातून हा स्फोट घडवला. एटीएसच्या प्राथमिक चौकशीनंतर २०११मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com