मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात होणार 3 पदे निर्माण!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात होणार 3 पदे निर्माण!

मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधी कक्षासाठी अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत देखील चालू ठेवण्यासाठी सावधी पदे (Tenure Posts) निर्माण करुन त्या पदांवर सध्या 3 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षासाठी नियुक्त करण्यात आलेले ३ अधिकारी या कक्षात रुजूही झाले आहेत. लेखा व कोषागारे संचालनालयातील १ सहायक संचालक व २ सहायक लेखा अधिकारी यांची नियुक्ती सध्या करण्यात आली आहे.

सौजन्य : डीजीआयपीआर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com