मोठी बातमी! राज्यातील ३ हजार महिला दुबईमध्ये अडकल्या ; रुपाली चाकणकर यांची माहिती

Rupali Chakankar
Rupali Chakankar

Rupali Chakankar : दुबईमध्ये महाराष्ट्रातील ३ हजार महिला अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. कामाच्या आमिषाने या महिलांना दुबईमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांचे कागदपत्र काढून घेतल्याचे सांगण्यात आले आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे. 

ओमन आणि दुबईमध्ये राज्यातील अडीच ते तीन हजार महिला अडकल्या आहेत. यामधील काही महिला अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचा खुलासा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. 

Rupali Chakankar
Bhagwant Mann : राज्यपालांनी विचारल्यावर उत्तर द्यावच लागेल; सरन्यायाधिशांनी खडसावलं

या महिलांसोबत सध्या संपर्क करण्यात येत आहे. काही महिलांनी संपर्क साधला असल्याचेही चाकणकर यांनी सांगितले आहे.  याबाबत आम्ही केंद्र सरकारकडे माहिती देऊन त्या महिलांना महाराष्ट्रात कसे आणता येईल याबाबत पाठपुरावा करत असल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या. 

Rupali Chakankar
Bacchu Kadu : “तुम्ही गद्दार आहात, डाकूसोबत गेलात…” ; वयोवृद्धाने बच्चू कडूंना भररस्त्यात झापलं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com