"उज्ज्वला योजनेचा 30 लाख महिलांना लाभ'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दारिद्य्ररेषेखालील लोकांना, महिलांना धूरमुक्त करण्यासाठी उज्ज्वला योजना गतिमानतेने राबवली. आतापर्यंत 30 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. कोणी कितीही अपप्रचार केला तरी प्रत्यक्ष कामावर या सरकारने भर दिलेला आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे येथे "उज्ज्वला दिवस'चे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार अमर साबळे अध्यक्षस्थानी होते. या योजनेंतर्गत पंढरपुरातील 207 महिलांना लाभ झाला आहे. शहरातील दारिद्य्ररेषेखालील महिलांनी भाजप कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
Web Title: 30 lakh women profit by ujjawala scheme