
Central Railway special Train
ESakal
मुंबई : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत मध्य रेल्वेने ३० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते मडगाव आणि पनवेल ते चिपळूणदरम्यान धावणार आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना दिलासा मिळाला आहे.