राज्यात आतापर्यंत ३० हजार रुग्ण घरी; ३७ हजार ५३४ रुग्णांवर उपचार सुरू 

राज्यात आतापर्यंत ३० हजार रुग्ण घरी; ३७ हजार ५३४ रुग्णांवर उपचार सुरू 

मुंबई - राज्यात आज ७७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार ५३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ७१ हजार ५७३ नमुन्यांपैकी ७० हजार १३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६७ हजार ५५२ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांत ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३६ हजार १८९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्यात ७६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे: ठाणे-७० (मुंबई ५२, ठाणे ५, नवी मुंबई ९, कल्याण डोंबिवली ४), नाशिक- ६ (मालेगाव ६), पुणे- ११ (पुणे ९, सोलापूर २), लातूर-१ (उस्मानाबाद १), अकोला-१(यवतमाळ १). दिवसभरातील मृत्यूंपैकी ४५ पुरुष तर ३१ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ७६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३७ रुग्ण आहेत तर ३६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ७६ रुग्णांपैकी ५१ जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३६२ झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com