राज्यात 320 नवीन निसर्ग पर्यटन केंद्रे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

पुणे - लोकसहभागातून राज्यात ३२० निसर्ग पर्यटन केंद्रे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठीच्या पहिल्या टप्प्यातील १०६ जागांवर काम सुरू करण्यात आले असून, पुढील पाच वर्षांसाठी १२० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

सध्याच्या प्रसिद्ध निसर्ग पर्यटन केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यामुळे स्थानिक पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहेत. याचा विचार करून राज्यात नवीन निसर्ग पर्यटन केंद्रे विकसित करण्यासाठी राज्य शासनाने २०१५ मध्ये स्वतंत्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना केली. स्थानिक वन संरक्षण समित्यांद्वारे ही केंद्रे संचालित असतील, अशी माहिती अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली. मंडळाचे सदस्य किशोर मिस्त्रीकोटकर, अनुज खरे, जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे उपस्थित होते.

एका दिवशी 80 हजार विद्यार्थ्यांची सहल 
शालेय विद्यार्थ्यांना निसर्गाचा अनुभव देण्यासाठी निसर्गानुभव संकल्पनेतून जानेवारी २०१९ मध्ये जिल्हा परिषद आणि आश्रमशाळांमधील ८० हजार विद्यार्थ्यांना एकाच दिवशी निसर्गाची सहल घडविणार आहोत. पुरातत्त्व विभागाशी समन्वय साधत गड, किल्ल्यांचादेखील विकास करणार आहे, असेही लिमये यांनी सांगितले.

Web Title: 320 new nature tourism center fund