सामाजिक मंडळांना ३२५ कोटींची खैरात

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 जानेवारी 2019

मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील चार सामाजिक विकास महामंडळांना राज्य सरकारने ३२५ कोटी रुपये कर्जाची हमी दिली आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. 

या सामाजिक मंडळांना कर्जहमी देताना ओबीसी, चांभार, अपंग, मातंग या समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. कारण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू होण्याची शक्‍यता आहे. तसेच राज्यात विधानसभा निवडणूक लोकसभेबरोबर झाली नाही, तर ऑक्‍टोबरमध्ये नक्‍कीच होणार आहे. यामुळे या दोन निवडणुका डोळ्यासमोर आर्थिक दुर्बल घटकांना आकर्षित करण्याचा हा सरकारचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. सरकारच्या विरोधात हे घटक जाऊ नयेत, यासाठी महामंडळाच्या माध्यमातून कर्जांचे वाटप करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मानले जाते. 

Web Title: 325 crores for Social Circles