राज्यात ३३ कोटी झाडे लावणार - मुनगंटीवार

गोखलेनगर - भांबुर्डा वन उद्यानाच्या उद्‌घानप्रसंगी झाडाला पाणी घालताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार. शेजारी महापौर मुक्ता टिळक व इतर मान्यवर.
गोखलेनगर - भांबुर्डा वन उद्यानाच्या उद्‌घानप्रसंगी झाडाला पाणी घालताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार. शेजारी महापौर मुक्ता टिळक व इतर मान्यवर.

गोखलेनगर - ‘‘मानव पर्यावरणाचे नुकसान करून स्वत:च्या पायावर दगड मारून घेत आहे. नद्या, नाले, तळी याचे माणसांकडून शोषण केले जात आहे. पर्यावरणाची चावी वृक्षांत आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात ३३ कोटी झाडे लावण्यात येतील,’’ अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

गोखलेनगर येथे भांबुर्डा वन उद्यानाचे उद्‌घाटन सोमवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. आमदार विजय काळे, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकारले आहे. मुनगंटीवार म्हणाले, ‘‘शिवाजीनगर व गोखलेनगर परिसरात पाण्यासाठी होणाऱ्या तीन टाक्‍यांना लवकरच परवानगी दिली जाईल. पुणे शहर ग्रीन व क्‍लीन सिटी करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल.’’

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी ६३ पाण्याच्या टाक्‍यांचे काम सध्या सुरू आहे. तसेच, पुढच्या वर्षी शहराला पाणीप्रश्न भेडसावणार नाही, यासाठी महापालिकेकडून नियोजन सुरू आहे.’’ आदित्य माळवे, ज्योत्स्ना एकबोटे, नीलम खाडे, प्रकाश ढोरे, धीरज घाटे, विजय शेवाळे, सुरेश कांबळे, माधुरी सहस्रबुद्धे, डॉ. शां. ब. मुजुमदार, रफीक सौदागर आदी उपस्थित होते.

मुनगंटीवार दोन तास उशिरा
उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाची वेळ सकाळी दहा वाजता होती, मात्र सुधीर मुनगंटीवार हे या कार्यक्रमासाठी दोन तास उशिरा आले. यामुळे नागरिकांना त्यांची वाट पाहत ताटकळत बसावे लागले. मंत्र्यांनी वेळ न पाळल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com