राज्यात ३३४ लाख टन गाळप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

भवानीनगर - राज्यात आजअखेर १८३ साखर कारखान्यांनी ३३४ लाख टन उसाचे गाळप करून ३४.६० लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. या वर्षी राज्याची दैनंदिन गाळप क्षमता साडेपाच लाखांवरून ७ लाख टनांवर पोचली आहे. 

चालू गळीत हंगामात अपेक्षेप्रमाणे पुणे विभागच गाळप व साखर उत्पादनात आघाडीवर असून, आतापर्यंत पुणे विभागाने यातील निम्मे गाळप म्हणजे १४१ लाख टनांचे गाळप करून १४.४७ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

पुणे येथे सर्वाधिक ६२ साखर कारखाने सध्या हंगाम घेत आहेत. मात्र, कोल्हापूरची साखर उताऱ्यातील मक्तेदारी कायम आहे. या विभागातील ३६ साखर कारखान्यांनी ७०.५२ लाख टन गाळप करताना साखर उतारा सरासरी ११.३१ टक्के ठेवून ७.९७ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. 

राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३६ टक्के असून, राज्यातील कारखान्यांची वाढलेली संख्या, कारखान्यांनी केलेली विस्तारवाढ यामुळे दैनंदिन गाळपाचा वेग चांगलाच वाढला आहे. मागील वर्षी साडेपाच लाख टन रोज गाळपक्षमता असलेल्या महाराष्ट्राची गाळपक्षमता यंदाच्या हंगामात ७ लाख टनांवर पोचल्याने अल्पावधीत ३३४ लाख टनांच्या गाळपाचा आकडा साखर उद्योगाने गाठला आहे.

जिल्ह्यात आजअखेर ३६ लाख टन गाळप
पुणे जिल्ह्यात आजअखेर ३६.५९ लाख टन उसाचे गाळप झाले असून, जिल्ह्यातील सोळा कारखान्यांमध्ये बारामती ॲग्रोने सर्वाधिक ५ लाख टनांच्या ऊस गाळपाचा आकडा ओलांडत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल दौंड शुगर ४.२६ लाख टन, सोमेश्‍वर, विघ्नहर, कर्मयोगी व छत्रपती कारखान्यांनी साडेतीन लाखांचा टप्पा गाठला आहे.

(साखर व ऊस लाख टनांमध्ये)
विभाग        कारखाने      ऊस गाळप        साखर उत्पादन 

कोल्हापूर       ३६             ७०.५२                 ७.९७
पुणे               ६२           १४१.७९                १४.४७
अहमदनगर    २८            ५१.५८                 ५.३३
औरंगाबाद       २२           २९.९३                 २.८२
नांदेड            ३१            ३८.२७                  ३.८१
अमरावती        १             ०.७५                  ०.०८
नागपूर            ३             १.१९                    ०.१

Web Title: 334 lakh Tone Sugarcane Galap in State