'घारापुरी'साठी 344 कोटींचा आराखडा मंजूर - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 26 मार्च 2017

मुंबई - घारापुरी (एलिफंटा) बेटावरील पर्यटन सुविधांच्या विकासाला गती देण्यात यावी. हे पर्यटनस्थळ जागतिक दर्जाचे होईल यादृष्टीने या पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी आवश्‍यक मंजुरी तातडीने देण्यात येईल. केंद्र सरकारकडील मंजुरी मिळविण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले. एकूण 344.37 कोटी रुपयांच्या पर्यटन सुविधा विकास आराखड्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या संदर्भात झालेल्या बैठकीत घारापुरी बेटांवर पर्यटन सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 92.87 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय खासगी सार्वजनिक भागीदारीतून या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी 251.50 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 344.37 कोटी रुपयांच्या पर्यटन सुविधा विकास आराखडा या वेळी मंजूर करण्यात आला.

बैठकीस पर्यटन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री मदन येरावार, मुख्य सचिव सुमित मलिक, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते.

Web Title: 344 caror plan sanction for gharapuri