esakal | आरटीई’च्या राखीव जागांसाठी ३६ हजार अर्ज; तांत्रिक अडचणींमुळे पालक नाराज

बोलून बातमी शोधा

 36,000 applications for RTE reserved seats }

शैक्षणिक वर्ष २०२१-२२साठी आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याअंतर्गत पालकांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना सहकार्य करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने आणि स्थानिक प्रशासनाने मदत कक्ष उभारले आहेत.

आरटीई’च्या राखीव जागांसाठी ३६ हजार अर्ज; तांत्रिक अडचणींमुळे पालक नाराज
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी संकेतस्थळावर अर्ज भरताना गुरुवारी दुपारपर्यंत तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. या प्रक्रियेतंर्गत अर्ज भरण्यास बुधवारपासून सुरवात झाली आहे. तर अर्ज भरण्याच्या दुसऱ्याच दिवशी संकेतस्थळ ‘डाऊन’ झाल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरता न आल्याने पालकांनी नाराजी झाल्याचे दिसून आले. 

शैक्षणिक वर्ष २०२१-२२साठी आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याअंतर्गत पालकांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना सहकार्य करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने आणि स्थानिक प्रशासनाने मदत कक्ष उभारले आहेत. काही पालक याद्वारे ऑनलाइन अर्ज, तर काही वैयक्तिकरित्या अर्ज भरत आहेत. अर्ज भरण्यासाठी २१ मार्च पर्यंत मुदत आहे. पालकांना अर्ज भरताना ‘सर्व्हर डाऊन’ झाल्यामुळे अर्ज भरण्यात बराच कालावधी लागत होता, असे पालकांचे म्हणणे आहे. 

अर्ज भरण्यास सुरवात झाल्यानंतर भरपूर पालक एकाच वेळी अर्ज भरू लागतात, अशावेळी यंत्रणेवर ताण येतो आणि व्यवस्था संथ होते. 
दिनकर टेमकर, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण विभाग 

गुरुवारपर्यंतची स्थिती 

राज्य ः 
- एकूण शाळा ः नऊ हजार ४३२ 
- जागा ः ९६ हजार ६२९ 
- भरलेले अर्ज ः ३६ हजार ८४२. 

पुणे ः 
- एकूण शाळा ः ९८५ 
- एकूण जागा ः १४ हजार ७७३ जागा 
- दोन दिवसांत भरलेले अर्ज ः १० हजार ५७० 

पालकांसाठी सूचना 
- अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे सोबत असावीत. 
- जवळच्या मदत केंद्रावर जाऊन अर्ज भरावा. 
- एका बालकासाठी एकच अर्ज भरावा. 
- एका बालकाचे दोन अर्ज केल्यास सर्व रद्द होतील. 
- अर्ज भरताना चुकल्यास तो रद्द करून पुन्हा भरावा 
- अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून जपून ठेवावी 

प्रवेशाचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा