दुचाकीस्वाराकडून नगरमध्ये 38 लाखांची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

नगर - नगर शहरातील महावीरनगर परिसरात एका दुचाकीस्वाराकडून पोलिसांनी गुरुवारी (ता. 2) रात्री तब्बल 38 लाख 50 हजार रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम चलनातून बंद केलेल्या एक हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे.

राहुल कांतिलाल भंडारी (रा. सारसनगर) असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. चौकशी करून पोलिसांनी त्यास सोडून दिले. दुचाकीस्वार मोठी रोकड घेऊन जात असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पोलिस पथकास मिळाली होती. महावीरनगर परिसरात उभ्या असलेल्या भंडारीजवळच्या पिशवीचा पोलिसांना संशय आला. त्यांनी हटकल्यावर सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी झडती घेतल्यावर भंडारीजवळ 38 लाख 50 हजार रुपयांची रक्कम आढळली. ती सर्व तक्कम एक हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होती. मुलांच्या खेळातील नोटांची तीन पुडकी, नोटांच्या आकारातील कोऱ्या कागदांची पुडकीही सापडली.

पोलिसांनी चौकशी करून भंडारीला सोडून दिले. हवालदार दीपक रोहोकले यांनी याबाबत फिर्याद दिली. या रकमेबाबत पोलिसांनी प्राप्तिकर खात्याच्या पुणे विभागाला कळविले आहे. त्यानुसार तेथील अधिकारी उद्या (शनिवारी) चौकशीसाठी येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भंडारी किराणा व्यावसायिक आहे. त्याच्याकडे एवढी मोठी रक्कम कशी आली, ती घेऊन तो कोणाकडे जात होता, याचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: 38 lakh cash seized in nagar

टॅग्स