मंत्र्यांच्या प्रवासावर ३९३ कोटी खर्च

Money
Money

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात परदेशी आणि देशांतर्गत प्रवास केला असून, या प्रवासांवर एकूण ३९३ कोटी ५७ लाख ५१ हजार ८९० रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना वेतन आणि खाते विभागाने ही माहिती दिली. त्यांनी पंतप्रधानांसह सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी पाच वर्षांत परदेशी आणि देशांतर्गत प्रवासांवर झालेल्या एकूण खर्चाची माहिती मागितली होती. सर्वाधिक खर्च परदेशी प्रवासांवर झाला असून, त्यावर झालेल्या एकूण खर्चाची रक्कम २९२ कोटी आहे; तर देशांतर्गत प्रवासांवर ११० कोटी खर्च झालेला आहे. वेतन आणि खाते विभागाने २०१४-१५ पासून ते २०१८-१९ या पाच वर्षांत परदेशी आणि देशांतर्गत प्रवासांवर झालेल्या एकूण खर्चाची आकडेवारी दिली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या नावांचा उल्लेख नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com