चंद्रपुरात पारा ४६.४ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

उच्चांकी तापमानाची नोंद; शहरात आगामी आठवडा कडक उन्हाचा

पुणे - मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उष्णतेची लाट कमी झाली असली तरीही उन्हाची काहिली मात्र कायम असल्याचे चित्र मंगळवारी दिसत होते. विदर्भातील उष्णतेची लाट पुढील चोवीस तास कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. राज्यात चंद्रपूर येथे उच्चांकी म्हणजे ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यातही या उन्हाळ्यातील सर्व उच्चांक मोडत कमाल तापमानाच्या पाऱ्याने ४०.८ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. 

विदर्भ वगळता राज्याच्या विविध भागांत उसळलेली उष्णतेची लाट कमी झाली आहे. मात्र, वायव्य भारतातून येणारे उष्ण आणि कोरडे वारे कायम असल्याने राज्याच्या कमाल तापमानाचा पारा अद्यापही ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. 

राज्यात कमाल तापमानाची नोंद झालेल्या प्रमुख ३१ शहरांपैकी २५ शहरांमधील तापमान चाळीसच्या वर होते. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर वगळता इतर सर्व ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढले होते. 

विदर्भातील सर्वांत कमी कमाल तापमान वाशीम येथे ४३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. इतर शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा ४४ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. पुढील दोन दिवस हा उन्हाचा चटका कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी झाल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. मात्र, या भागात उन्हाचा चटका कायम होता. 
 
पुण्यात यंदाच्या उन्हाळ्यातील नवा उच्चांक
शहरात कमाल तापमानाचा नवा उच्चांक नोंदविला गेला. शहरात यंदाच्या उन्हाळ्यातील ४०.६ अंश सेल्सिअस हे उच्चांकी तापमान होते. तो उच्चांक मोडून ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. लोहगाव येथे ४२.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. शहरात येत्या सोमवारपर्यंत (ता. २४) कडक उन्हाळा राहणार आहे. या दरम्यान कमाल तापमानाचा पारा ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्‍यताही हवामान खात्याने व्यक्त केली. 

विदर्भातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 
शहर    तापमान 

चंद्रपूर    ४६.४ 
ब्रह्मपुरी    ४५.८ 
नागपूर    ४५.५ 
वर्धा    ४५.० 
अकोला    ४४.९ 
यवतमाळ    ४४.० 
गोंदिया    ४४.०
अमरावती    ४३.६ 
बुलडाणा    ४१.०

Web Title: 46.4 degree temperature in chandrapur