महिला बचतगटांना 47 कोटींचे कर्ज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मार्च 2019

महिला बचतगटांच्या उद्योग-व्यवसायाला हातभार लावत त्यांना नवउभारी देण्यासाठी राज्य सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला बचतगटांसाठी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेनेही पुढाकार घेतला आहे.

औरंगाबाद : महिला बचतगटांच्या उद्योग-व्यवसायाला हातभार लावत त्यांना नवउभारी देण्यासाठी राज्य सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला बचतगटांसाठी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेनेही पुढाकार घेतला आहे. बॅंकेतर्फे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह ठाणे व इतर जिल्ह्यांतील तीन हजार 156 बचतगटांना 47 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष महेंद्रकुमार काबरा यांनी "सकाळ'ला दिली.

बचतगटाच्या माध्यमातून महिलांना उभारी मिळून नवे उद्योजक तयार होत आहेत. राज्यातही अनेक महिला बचतगटांनी उत्तुंग कामगिरी केलेली आहे. अशाच पद्धतीने मराठवाड्यातील महिला बचतगटांना अर्थसाहाय्य करीत त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतर्फे केले जात आहे. बॅंकेच्या शाखेच्या माध्यमातून हे कर्जवाटप करण्यात आले. प्रत्येक गट सक्षम व्हावा, याच उद्देशाने हे कर्जवाटप करण्यात आले आहे, असेही काबरा यांनी सांगितले. 

विभाग----------- बचतगट संख्या----------------कर्जवाटप (सर्व रक्‍कम कोटींमध्ये, 31 जानेवारीपर्यंत) 
औरंगाबाद----------1,372--------------------25.36 
बीड----------------338--------------------3.62 
लातूर --------------589--------------------6.97 
नांदेड---------------359-------------------- 4.63 
परभणी--------------320--------------------4.32 
ठाणे----------------167---------------------2.11 
एकूण---------------3,156--------------------47.01 कोटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 47 crores loan to women of Bachat Gat