राज्यातील ४९५ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदलींवर फुली!; विशेष पोलिस महानिरीक्षकांचे आदेश

सूरज पाटील
Thursday, 17 December 2020

विहित कालावधी पूर्ण न झालेल्या नि:शस्त्र सहायक पोलिस निरीक्षकांच्या प्रमुखांकडून शिफारशीसह विनंती अर्ज पोलिस आस्थापना मंडळासमोर २९ ऑक्‍टोबर २०१० रोजी सादर करण्यात आले होते. या प्रकरणांवर पोलिस आस्थापना मंडळ क्रमांक दोन यांनी सविस्तर चर्चा केली. विनंतीबाबत सर्व प्रशासकीय बाबींचा उहापोह करण्यात आला.

यवतमाळ : राज्यभरात कार्यरत सहायक पोलिस निरीक्षकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. आस्थापना विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी सर्व बाबींची पडताळणी करून राज्यातील तब्बल ४९५ सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदलीवर फुली मारली आहे. त्यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विहित कालावधी पूर्ण न झालेल्या नि:शस्त्र सहायक पोलिस निरीक्षकांच्या प्रमुखांकडून शिफारशीसह विनंती अर्ज पोलिस आस्थापना मंडळासमोर २९ ऑक्‍टोबर २०१० रोजी सादर करण्यात आले होते. या प्रकरणांवर पोलिस आस्थापना मंडळ क्रमांक दोन यांनी सविस्तर चर्चा केली. विनंतीबाबत सर्व प्रशासकीय बाबींचा उहापोह करण्यात आला.

जाणून घ्या - "जीवनाला कंटाळलो आहे" असं म्हणत युवक थेट चढला रेल्वेच्या डब्यावर अन् घडला अंगावर काटे आणणारा थरार

ज्या घटकांमध्ये बदली मागण्यात आली, तेथील रिक्तपदांची स्थिती, ज्या कारणास्तव बदलीची विनंती करण्यात आली, त्या कारणांचे गांभीर्य व तातडीची निकड, आतापर्यंत पूर्ण केलेला कार्यकाळ आदी बाबींचा सांगोपांग विचार करून विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी सहायक पोलिस महानिरीक्षकांच्या बदल्या अमान्य केल्या आहेत. या आदेशामुळे विनंती बदलीसाठी फिल्डिंग लावलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना मोठा दणका बसल्याचे मानले जात आहे.

नागपूर जिल्ह्याची फिप्टी

ठाणे शहर २७, नवी मुंबई १५, पुणे शहर १३, सोलापूर चार, नाशिक शहर १६, औरंगाबाद शहर तीन, अमरावती शहर आठ व नागपूर जिल्ह्यातील विनंती बदलीचे तब्बल ५४ अर्ज प्राप्त झाले होते. नागपूर जिल्ह्यातील अर्जांची फिप्टी आश्‍चर्यजनक आकडा मानला जात आहे. मुंबई लोहमार्ग २०, रायगड एक, सिंधुदुर्ग पाच, पालघर एक, सातारा चार, सोलापूर ग्रामीण एक, कोल्हापूर दोन, नाशिक ग्रामीण चार, धुळे तीन, जळगाव सहा, अहमदनगर चार, जालना दोन,

सविस्तर वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज

बीड दहा, उस्मानाबाद सहा, नांदेड दहा, परभणी एक, लातूर पाच, अमरावती ग्रामीण १३, अकोला पाच, वाशीम चार, बुलडाणा १५, यवतमाळ आठ, नागपूर ग्रामीण आठ, वर्धा नऊ, भंडारा आठ, चंद्रपूर १७, गोंदिया तीन, मुंबई शहर ३२ यांच्यासह इतर विभागांत कार्यरत सहायक पोलिस निरीक्षकांनी बदलीसाठी विनंती अर्ज केले होते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 495 assistant police inspector to be transferred in the state