
Belgaum News: बेळगावमध्ये भीषण अपघात: ५ जण जागीच ठार
बेळगावमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये ५ जण ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (5 people died in an accident in Belgaum )
सौंदत्तीला दर्शनासाठी जात असताना मध्यरात्री हा अपघात झाला आहे. रामदुर्ग तालुक्यातील चुंचानूर मध्ये हा अपघात झाला. जखमी रुग्णांना गोकाक येथील रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. (Belgaum News)
मिळालेल्या माहितीनुसार, यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जात असताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे गाडी झाडावर आदळली आणि गाडीत बसलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड
हा भीषण अपघात बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील चुंचानूर गावाजवळ घडला असून या दुर्घटनेत दोन मुलींसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारने 5 लाखांची भरपाई जाहीर केली आहे.
झालेल्या या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाल्याची माहिती आहे.