‘ओबीसी महामंडळास ५०० कोटी देणार’

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मुंबई - इतर मागासवर्गातील युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी ओबीसी महामंडळास दोन अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५०० कोटी रुपये देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नोकऱ्यांमध्ये आरक्षणातील कोट्याप्रमाणे जागा भरल्या नसतील, तर त्या भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच, महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा, यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. राज्य शासनाने नवीन ओबीसी मंत्रालयाची स्थापना केल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, की इतर मागासवर्गासाठी जे जे आवश्‍यक आहे ते सर्व देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. ओबीसींसाठीच्या राष्ट्रीय मागास आयोगाला संविधानिक दर्जा देण्याच्या घटना दुरुस्तीला कालच संसदेने मान्यता दिली आहे. सत्तर वर्षांनंतर केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यात इतर मागासवर्गाला आरक्षणातील कोट्याप्रमाणे नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले की नाही, याची माहिती जाहीर करण्यात येईल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Web Title: 500 Crore to OBC Mahamandal