लवकरच धावणार 500 नव्या लालपऱ्या : मुनगंटीवार

लवकरच धावणार 500 नव्या लालपऱ्या : मुनगंटीवार

अकाेला : ''राज्यात लवकरच नव्या काेऱ्या 500 लालपऱ्या धावणार असून, यासाठी परिवहन मंत्रालयाला निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

राज्य परिवहन महामंडळाच्या १८ हजार ८५० बसेस दरराेज सुमारे ६७ लाख प्रवाशांना घेऊन राज्यातील कानाकाेपऱ्यापर्यंत धावत अाहेत. शहर अाणि ग्रामीण भागासह दऱ्याखाेऱ्यातून मार्ग काढत दुर्गम भागतही लालपरी म्हणून अाेळखली जाणारी राज्य परिवहन महमंडळाची बस ही प्रवासासाठी सर्वात उत्तम सेवा म्हणून अाेळखली जाते. वर्षाला २४५ काेटी प्रवासी या लालपरीतून प्रवास करतात. मुंबई- काेकण विभागासह पुणे, नाशिक अाणि मराठवाडा विभागात सर्वाधिक बसेस धावतात.

प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाला ५०० नव्या बसेस खरेदी करण्यास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी उपलब्ध करून देण्याची घाेषणा केली. हा निधी उपलब्ध व्हावा यासाठी  अर्थ संकल्प नियाेजन विभागास अर्थमंत्र्यांनी निर्देश दिले अाहेत.

राज्यात धावणाऱ्या एकूण बसेस

विभाग             बसची संख्या

अमरावती-        १९००

नागपूर -           १८५०

मराठवाडा-        ३४९२

नाशिक -          ३६५०

पुणे-               ४४००

मुंबई, काेकण-    ३५००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com