कोरोना लसीकरणासाठी राज्यात ५११ केंद्रे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

राज्यात मुंबई खालोखाल पुणे जिल्ह्यात लसीकरण केंद्रे आहेत. राज्यातील ५११ पैकी १२७ केंद्रे या दोन मोठ्या शहरांच्या परिसरात असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकाला ही लस पहिल्या टप्प्यात देण्यात येईल. ही लस घेणे प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

पुणे - राज्यात मुंबई खालोखाल पुणे जिल्ह्यात लसीकरण केंद्रे आहेत. राज्यातील ५११ पैकी १२७ केंद्रे या दोन मोठ्या शहरांच्या परिसरात असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकाला ही लस पहिल्या टप्प्यात देण्यात येईल. ही लस घेणे प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झाला होता. या पार्श्‍वभूमीवर येथील लसीकरणाकडे लक्ष लागले आहे. राज्यातील आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागाने पूर्ण केली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून ५११ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

No photo description available.

"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

सर्वाधिक लसीकरण केंद्रे मुंबईत असून त्यांची संख्या ७२ आहे. त्या खालोखाल पुण्यात ५५ लसीकरण केंद्रे आहेत. यात पुणे शहरात १६, पिंपरी-चिंचवडमध्ये १६ व जिल्ह्यातील २३ केंद्रांचा समावेश आहे. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग मिळून सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे.

अस्सं सासर सुरेख बाबा! 

सर्व परिमंडळांना पुण्यातून पुरवठा
सीरमकडून वितरित केली जाणार लस सुरुवातीला पुण्यात येईल. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य खात्याच्या आठ परिमंडळांमध्ये लस रवाना केली जाईल. पुण्यासाठी येथे फक्त लस ठेवण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या डोस पाठविण्यात येणार येतील.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 511 centers in the state for corona vaccination