महाराष्ट्र राज्यातील ५४ पोलिसांना पदके

Award
Award

नवी दिल्ली - कर्तव्य बजाविताना शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या देशभरातील ६५७ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट सेवा पदके जाहीर केली. यात राष्ट्रपतींचे पोलिस पदक, पोलिस शौर्यपदक, अतिविशिष्ट सेवापदक, उल्लेखनीय सेवापदक या पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ५४ अधिकाऱ्यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.

जम्मू-काश्‍मीरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अब्दुल जब्बार, उपअधीक्षक गाझी हसन शेख, आसीफ अब्दुल कुरेशी आणि ‘सीआरपीएफ’चे उत्पल राभा यांना मरणोत्तर राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील दहा अधिकाऱ्यांना पोलिस शौर्यपदक, चौघांना अतिविशिष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक आणि उर्वरित ४० जणांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलिस पदक मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com