बॅंकांत 5.44 लाख कोटींच्या जुन्या नोटा

पीटीआय
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

मुंबई - पाचशे व हजारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर 18 नोव्हेंबरपर्यंत वेगवेगळ्या बॅंकांमध्ये 5.44 लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा नागरिकांनी जमा केल्या; तसेच बदलून घेतल्या आहेत. बॅंकांनी 10 ते 18 नोव्हेंबर या काळात एटीएम मशिनमधून 1 लाख 3 हजार 216 कोटी रुपये वितरीत केले आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे.

पाचशे व हजारच्या नोटा 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून चलनातून बंद करण्यात आल्या. याच वेळी रिझर्व्ह बॅंकेने या नोटा बदलण्याची; तसेच जमा करण्याच्या उपाययोजना जाहीर केल्या होत्या. रिझर्व्ह बॅंकेची कार्यालये, सरकारी बॅंका, खासगी बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बॅंका आणि नागरी सहकारी बॅंकांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. बॅंकांमध्ये 10 नोव्हेंबरपासून ते 18 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटांच्या स्वरूपात 5 लाख 44 हजार 571 कोटी जमा; तसेच बदलून घेतले आहेत. यातील 33 हजार 6 कोटी बदलून घेतले आहेत, तर 5 लाख 11 हजार 565 कोटी रुपये जमा झाले आहेत. बॅंकांच्या एटीएममधून नागरिकांनी या काळात 1 लाख 3 हजार 316 कोटी रुपये काढले आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅंका 10 नोव्हेंबरला उघडल्यानंतर मोठ्या रांगा जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी लागल्या होत्या. टपाल कार्यालयांमध्येही हीच परिस्थिती होती. तसेच, एटीएमबाहेर नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. दरम्यान, सरकारने जुन्या नोटांचा वापर पेट्रोल व डिझेल खरेदी, रेल्वे व विमान तिकीट, सरकारी कर भरणा आणि सरकारी रुग्णालयांमध्ये करण्याची सवलत दिली होती.

बॅंकांतील जुन्या नोटा (10 ते 18 नोव्हेंबर)
नोटा जमा : 5 लाख 11 हजार 565 कोटी
बदललेल्या नोटा : 33 हजार 6 कोटी
एकूण जुन्या नोटा : 5 लाख 44 हजार 571 कोटी
एटीएममधून व्यवहार : 1 लाख 3 हजार 316 कोटी

Web Title: 5.44 lakh crore in the old currency banks