तुरुंगातील ५६ शेतकऱ्यांना मिळाली कर्जमाफी

दीपा कदम
सोमवार, 11 जून 2018

मुंबई - शेतकरी कर्जमाफीचा बोजवारा उडालेला असताना कारावासाची शिक्षा भोगत असणाऱ्या शेतकरी कैद्यांना कर्जमाफी मिळाली आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या कारावासात असणाऱ्या ५६ कैद्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

कपाळावर गुन्हेगाराचा शिक्का बसल्यानंतर त्यांच्यामागे कुटुंबाची अगदी वाताहात होते. त्याच्या कुटुंबाला आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो. समाजातील पत घसरल्याने नवीन कर्ज मिळत नाही. नव्याने आयुष्य उभे करण्याची संधी मिळत नाही, अशा कोंडी झालेल्या शेतकरी कैद्यांना यानिमित्ताने पुन्हा एकदा चांगले आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. 

नागपूर आणि नाशिकच्या कारागृहात शेतकरी कैद्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा शेतकरी कैद्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोचवण्यासाठी तुरुंग महासंचालनालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. नागपूरमधील ६६, तर नाशिकमधील २२ शेतकरी कैद्यांतर्फे काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. त्यापैकी ५६ शेतकरी कैद्यांना कर्जमाफी मिळाली आहे. कर्जमाफीसाठी अर्ज भरूनही लाभ न मिळालेल्या ३२ कैद्यांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुन्हा भरले जाणार असल्याने त्यांनाही याचा लाभ मिळेल.

अशी ही कर्जमाफी
अर्ज भरलेले कैदी    ८८
नागपूर कारागृह    ६६
नाशिक कारागृह    २२
यांना कर्जमाफी    ५६

Web Title: 56 prisoners received debt relief to farmers