कांदा उत्पादकांची 6 कोटींची फसवणूक

कांदा उत्पादकांची 6 कोटींची फसवणूक

नाशिक : कांद्याची आवक वाढताच गडगडणारे बाजारभाव, वाढती महागाई, मजूर टंचाई, खालावलेली भूजल पातळी, अवकाळी पावसाचा फटका, रोगट हवामान आदी अडचणींचा सामना करत प्रतिकूल परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याची शेती फुलविली. परंतु सध्या कांदा व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणूक तंत्रामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यातील 1100 कांदा उत्पादकांची सुमारे 6 कोटी रुपयांची रक्कम व्यापाऱ्यांनी थकविली आहे. 

नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना कांद्याचे मोठे आकर्षण असल्याने वर्षाकाठी पावसाळी, रांगडा (लेट खरीप) उन्हाळी असे कांद्याचे तीन हंगाम घेतले जातात. चव, चकाकी, साठवण क्षमता, गुणवत्ता आदी बाबींमुळे भारतात सर्वाधिक कांद्याची निर्यात नाशिक जिल्ह्यातून होते. यंदा प्रथमच उन्हाळ कांद्याच्या बरोबरीने लाल कांद्याला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सदर कांद्याच्या विक्रीची रक्कम तातडीने मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात कांदा उत्पादकांच्या फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जिल्ह्यातील अग्रगण्य बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांना कांद्याचे पेमेंट न मिळत त्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार नऊ ते दहा महिन्यांपासून समोर आला आहे. शेतमालाचे गेल्या चार महिन्यांपासून पैसे मिळत नसल्याने जिल्ह्यातील अकराशे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. याबाबत बाजार समिती प्रशासनाकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर बाजार समितीमधील संबंधित व्यापाऱ्यांची खरेदी थांबविण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com