मोठी बातमी! 7/12 उतारा जोडून ‘इथे’ करा अर्ज, ‘महावितरण’ देईल ३ दिवसांत वीज कनेक्शन

‘महावितरण’ ॲपवरील ए-वन फॉर्म भरावा. त्यावेळी शेतकऱ्यांनी स्वत:ची माहिती व सातबारा उतारा अपलोड करावा. त्यावर बोअर किंवा विहिरीची नोंद असावी. त्यानंतर कनेक्शन घेण्यासाठीचा 3 ते 4 हजारांचा खर्च आणि सेक्युरिटी डिपॉझिट भरल्यास 3 दिवसांत विद्युत जोडणी दिली जाते.
वीज बिल
वीज बिल टिम ई सकाळ

सोलापूर : ‘महावितरण’च्या ॲपवरील ए-वन फॉर्म भरावा. त्यावेळी शेतकऱ्यांनी स्वत:ची माहिती व सातबारा उतारा अपलोड करावा. त्यावर बोअर किंवा विहिरीची नोंद असावी लागते. त्यानंतर कनेक्शन घेण्यासाठीचा तीन ते चार हजारांचा खर्च आणि सेक्युरिटी डिपॉझिट प्रत्येक ‘एचपी’ला एक हजार रुपये भरल्यास तीन दिवसांत विद्युत जोडणी दिली जाते. पण, वीजेचा खांब आणि कनेक्शनमधील अंतर ३० मीटरपर्यंत असणे आवश्यक आहे.

सोलापूर जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत कृषी पंपाचे कनेक्शन देण्याचे नियोजन ‘महावितरण’ने केले आहे. दुसरीकडे जून २०२१ नंतर अर्ज केलेल्या आठ हजार ७५ शेतकऱ्यांना अजून कनेक्शन मिळालेले नाही. त्या शेतकऱ्यांचे कनेक्शन व जवळील डीपीमधील अंतर २०० ते ६०० मीटरपर्यंत अंतर आहे.

त्यांना कनेक्शन देण्यासाठी तेथे डीपी (ट्रान्स्फॉर्मर) बसवावा लागणार आहे. त्यासाठी शासनाकडून निधी मिळणे अपेक्षित आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्याने जून २०२१ पर्यंतच्या अर्जदार शेतकऱ्यांना ‘महावितरण’ने कनेक्शन दिलेले आहे. आता शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर टप्प्याटप्याने राहिलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळणार आहे. वीज चोरी रोखण्यासाठी वेळेत कनेक्शन देणे, हा पर्याय रास्त मानला जातो. दरम्यान, कनेक्शनसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन किंवा संबंधित कार्यालयात प्रत्यक्षात जाऊन देखील अर्ज करण्याची मुभा आहे.

शेतकऱ्यांना ‘सोलर’चा फायद्याचा पर्याय

तीन ‘एचपी’ कनेक्शनच्या सोलर पंपासाठी जवळपास साडेतेरा हजार रुपये तर पाच ‘एचपी’चा पंप २७ ते २८ हजार रुपयांत बसवून मिळतो. केवळ दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. उर्वरित ९० टक्के अनुदान ‘महावितरण’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळते. सोलर पॅनल बसविल्यानंतर संबंधित कंपनी मोटारीसह पाणी बाहेर काढून दिले जाते. पाच वर्षे कंपनीच त्याचा मेन्टेनंस करते आणि त्या पॅनलवर पाच वर्षांसाठी विमा देखील काढून दिला जातो. ‘महावितरण’ने आता ६०० मीटरपेक्षा अंतर असलेल्या कनेक्शन धारकांसाठी सोलर पॅनल बसविण्याची अट घातली आहे. इतर शेतकरी देखील सोलर पॅनलसाठी अर्ज करू शकतात. डिसेंबर २०२५पर्यंत ३० टक्के फिडर सोलारवर केले जाणार असून त्यादृष्टीने जागांची निवड करण्यात आली आहे.

३० मीटरपर्यंतची वीज जोडणी तात्काळ

कृषीपंपाचे कनेक्शन घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज करता येतो. कनेक्शनचे अंतर ३० मीटरपर्यंत असल्यास तत्काळ जोडणी दिली जाते. २०० ते ६०० मीटरपर्यंत अंतर असल्यास थोडासा विलंब होतो. पण, सर्वांनाच टप्प्याटप्प्याने कनेक्शन दिले जाते.

- संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com