विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 76 उमेदवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुंबई - येत्या 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधान परिषदेतील पाच जागांच्या निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांबरोबर अपक्ष उमेदवारांनी गर्दी केली आहे. या पाच जागांसाठी तब्बल 76 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. 

मुंबई - येत्या 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधान परिषदेतील पाच जागांच्या निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांबरोबर अपक्ष उमेदवारांनी गर्दी केली आहे. या पाच जागांसाठी तब्बल 76 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. 

विधान परिषदेत निवडून द्यावयाच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघातून दोन तर नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघातून तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, बहुजन समाज पार्टी, लोकभारती, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. यांच्यासोबत अन्य अपक्षांनीही निवडणुकीत उडी घेतल्याने निवडणूक चुरशीची ठरली आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपने डॉ. रणजित पाटील, नाशिक मधून कॉंग्रेसने डॉ. सुधीर तांबे, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने विक्रम काळे यांना पुन्हा संधी दिली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातून रामनाथ मोते तर नागपूर शिक्षक मतदारसंघातून ना. गो. गाणार भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून पुन्हा नशीब आजमावत आहेत. आमदार कपिल पाटील यांनी लोकभारतीच्या तिकिटावर नागपूर येथून राजेंद्र झाडे आणि कोकण मतदारसंघातून अशोक बेलसरे यांना तिकिट दिले आहे. या प्रमुख उमेदवारांसह अपक्ष तसेच अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीत उडी घेतल्याने निवडणूक रंगतदार ठरली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 3 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 6 फेब्रुवारी रोजी लागेल. 

मतदारसंघनिहाय उमेदवार 
नागपूर शिक्षक मतदारसंघ ः- अनिल शिंदे - कॉंग्रेस; प्रकाशभाऊ जाधव - शिवसेना; राजेंद्र झाडे- लोकभारती; नागो गाणार- अपक्ष 
एकूण उमेदवार - 16 
एकूण मतदार - 34 हजार 752 

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ ः- विक्रम काळे - राष्ट्रवादी कॉंग्रेस, डॉ. गोविंद काळे - शिवसेना, मधुकर उन्हाळे - बसपा 
एकूण उमेदवार - 20 
एकूण मतदार - 58 हजार 410 

कोकण शिक्षक मतदारसंघ ः- रामनाथ मोते - भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष, ज्ञानेश्‍वर म्हात्रे- शिवसेना, अशोक बेलसरे- लोकभारती, बाळाराम पाटील - राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष 
एकूण उमेदवार - 10 
एकूण मतदार - 37 हजार 646 

नाशिक पदवीधर मतदारसंघ - डॉ. सुधीर तांबे - कॉंग्रेस, डॉ. प्रशांत पाटील - भाजप, प्रकाश डेसले - कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 
एकूण उमेदवार - 17 
एकूण मतदार - 2 लाख 56 हजार 472 

अमरावती पदवीधर मतदारसंघ - डॉ. रणजित पाटील - भाजप, संजय, खोडके - कॉंग्रेस 
एकूण उमेदवार - 13 
एकूण मतदार - 2 लाख 10 हजार 511 

Web Title: 76 candidates for the five seats of the Legislative Council