कुपोषणाच्या उंबरठ्यावर सव्वापाच लाख मुले 

Malnourished-children
Malnourished-children

सोलापूर - राज्यातील अंगणवाड्यांमध्ये सध्या 57 लाख 27 हजार 940 विद्यार्थी आहेत. त्यापैकी पाच लाख 21 हजार 183 मुले कुपोषणाच्या उंबरठ्यावर असून, 78 हजार 989 विद्यार्थी कुपोषित आहेत. जनजागृतीवर दरवर्षी 144 कोटींचा खर्च करूनही राज्यातील कुपोषण कमी झालेले नसून, आदिवासींच्या तुलनेत ग्रामीण भागात त्याचे प्रमाण वाढले आहे. 

देशातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी सात महिन्यांच्या गर्भवती मातांची ओटी भरणे, मूल सहा महिन्यांचे झाल्यानंतर त्याचा अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करणे, अंगणवाडी परिसरातील पुरुषांना बोलावून कुपोषण दिन साजरा करणे, स्वच्छतेविषयक जनजागृती करणे, सहा वर्षांनंतर मूल पहिलीत जाण्यास तयार व्हावे म्हणून प्रवेशोत्सव, असे कार्यक्रम अंगणवाड्यांमध्ये राबवावेत यासाठी केंद्र सरकारच्या वतीने दरमहा पाचशे रुपये दिले जातात. मात्र, समुपदेशन कार्यक्रमांना राज्यभरातील तब्बल 27 लाख विद्यार्थी गैरहजर राहत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य व कुपोषण विभागाने दिली आहे. 

कुपोषणाच्या उंबरठ्यावरील बालकांना बरे करणे अन्‌ कुपोषित बालकांना मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती उपायुक्‍त जामसिंग गिरासे यांनी दिली. 

राज्याची सद्यःस्थिती 
553  - कुपोषित बालकांसाठीचे प्रकल्प 
25.19 लाख - अंगणवाडीतील मुले (सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत) 
22.93 लाख - तीन ते सहा वर्षांपर्यंतची मुले 
5.21 लाख - कुपोषणाच्या उंबरठ्यावरील मुले 
78,989 -  कुपोषित बालके 

राज्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी दरवर्षी सुमारे 144 कोटींचा खर्च केला जातो. जनजागृती कार्यक्रमात केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले आहे. 
- जामसिंग गिरासे, उपायुक्‍त, आरोग्य व पोषण, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com