महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले 800 विद्यार्थी अडकले या देशात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

कोरोनाच्या पाश्वभूमीवर किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथील इंटरनॅशनल स्कूल ऑफ मेडिसिन (आय एस एम) येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले पुण्यासह राज्यभरातील अनेक विद्यार्थी शासनाच्या धोरणामुळे अडकून पडलेले आहेत. असे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कळविले आहे. केंद्र व त्या त्या राज्य सरकारच्या प्रयत्नांतून देशातील विविध राज्यांतील अनेक विद्यार्थी व नागरीक सध्या मायदेशी परतत आहेत.

मोशी - कोरोनाच्या पाश्वभूमीवर किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथील इंटरनॅशनल स्कूल ऑफ मेडिसिन (आय एस एम) येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले पुण्यासह राज्यभरातील अनेक विद्यार्थी शासनाच्या धोरणामुळे अडकून पडलेले आहेत. असे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कळविले आहे. केंद्र व त्या त्या राज्य सरकारच्या प्रयत्नांतून देशातील विविध राज्यांतील अनेक विद्यार्थी व नागरीक सध्या मायदेशी परतत आहेत. मात्र विमानसेवेअभावी महाराष्ट्रातील 800 मुले या देशात अडकून पडल्याने या पालकांसह या मुलांचीही चिंता वाढली असल्याने हे पालक व विद्यार्थी चिंतातूर झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याबाबत दिल्लीतील संबंधित अधिकारी यांच्याशी पालकांनी संपर्क साधला असता, महाराष्ट्र राज्यात विमान उतरण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे दिल्लीतील अधिकारी या पालकांना सांगत आहेत. त्यामुळे मुलांच्या चिंतेने पालक स्थानिक लोकप्रतिनिधींकडे मदत मागत आहेत परंतु आश्वासन आणि दिल्लीकडे बोट दाखवण्यापलीकडे काहीही होत नसल्याचे पालकांनी सांगितले आहे. मुलांच्या काळजीने पालक वारंवार विदेश मंत्रालय संपर्क साधत आहेत परंतु त्यांच्याकडून महाराष्ट्र कडे बोट दाखवले जात आहे. महाराष्ट्रामध्ये विमान उतरण्यास परवानगी दिली जात नसल्याचे विदेश मंत्रालयाकडून पालकांना सांगितले जात आहे.

...आणि त्या गर्भवती मातेला मिळाली मायेची सावली !

 कोरोनाच्या या काळात अनेक प्रकारची मदत केली जात असल्याचे दावे सरकारकडून केले जात आहेत. या राज्यासह इतर राज्यातील अनेक विद्यार्थी व नागरीकही मायदेशी परतत आहेत. फक्त फेसबुकसारख्या माध्यमावर केलेल्या एका विनंतीने इंग्लंड येथे अडकलेल्या एका विद्यार्थीनी मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे वाचनात आले आहे. मग इथेतर शेकडो विद्यार्थी अडकले आहेत. मग आमच्याच विद्यार्थ्यांना आणण्यासाठी काय अडचण आहे.

यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी निकराने प्रयत्न करण्याची मागणीने जोर धरला आहे.

लॉकडाउनमुळे चहाविक्री बंद; व्यावसायिकांना आर्थिक फटका

बिश्केक येथील आयएसएम मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी गेल्या दोन महिन्यांपासून लाॅकडाऊनमुळे वसतीगृहात आणि फ्लॅटमध्ये अडकून पडलेले आहेत. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थी वसतिगृहात आणि पुढील वर्षातील विद्यार्थी फ्लॅटमध्ये राहतात. येथील लाॅकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांना आहे त्याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना जेवणासह अनेक असुविधांना सामोरे जावे लागत आहे.

हताश झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांशी संपर्क साधत घरी नेण्यासाठी आक्रोश मांडला आहे. 

संबंधित पालक आणि विद्यार्थी यानी संबधित मंत्री खासदार, आमदार यांना या समस्येची पुर्वसूचना दिली आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे कार्यालयीन सचिव श्रीकर परदेशी (+919049996666) आणि किरझिकस्तान देशातील पोन्नापन येथील भारतीय राजदूत अलोक डिम्री ( +996555719721 ) यांना संबधीत पालकांनी संपर्क केला असता, भारत सरकारने परवानगी दिलेली आहे, जर महाराष्ट्र सरकारने योग्य ती परवानगी दिली आणि योग्य ती वैद्यकीय व्यवस्था केली तरच तुम्हाला विमानाने मुंबईत येता येईल.

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथून 13 जून पर्यंत भारतासाठी विमान सोडण्यात येणार आहेत. परंतु यात महाराष्ट्रासाठी एकही विमान नाही. अन्य राज्यांच्या विमानात महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना घेण्यात येणार नाही. शहरातील आणि राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींशी संपर्क केला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी निकराने प्रयत्न करावा ही एक पालक या नात्याने कळकळीची विनंती.

सुनिल खेडकर, मोशी प्राधिकरण पिंपरी-चिंचवड. विद्यार्थ्यांनी पालक +919822413090


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 800 students from Maharashtra who went for medical education are stuck in this country