561 ग्रामपंचायतींसाठी सुमारे 82 टक्के मतदान 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 मे 2018

मुंबई - राज्यातील विविध 31 जिल्ह्यांतील 561 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 174 ग्रामपंचायतीमधील 237 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 82 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. 

सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत मात्र केवळ दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. पालघर, भंडारा व गोंदिया हे तीन जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील मतमोजणी उद्या (ता. 28) होईल. पालघर, भंडारा व गोंदिया या तीन जिल्ह्यांत लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (ता. 28) मतदान होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत आज झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी 4 जून 2018 रोजी होईल. 

Web Title: 82 percent polling for 561 Gram Panchayats