esakal | राज्यात दिवसभरात ८,९१२ रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट ९५.७६ टक्क्यांवर
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update : राज्यात दिवसभरात ८,९१२ रुग्णांची नोंद

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यात दिवसभरात ८,९१२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर उपचार घेत असलेले १०,३७३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, २५७ रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्यविभागानं ही माहिती दिली. (8912 patients registered in the Maharashtra during the day)

आरोग्यविभागाच्या माहितीनुसार, राज्यात सध्या १,३२,५९७ अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर आजवर ५७,१०,३५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एकूण १,१७,३५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्याचं कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.७६ टक्क्यांवर पोहोचलं आहे.

दरम्यान, मुंबईत दिवसभरात ६९६ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ७९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच १३ कोरोना रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला. मुंबईत सध्या १४,७५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आजवर शहरात ६,८८,३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, शहरात आजवर १५,२७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्याचबरोबर पुण्यात शनिवारी २११ नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर ३०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात शहरात ८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात सध्या २,५५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज ५,७२४ कोरोना चाचण्या पार पडल्या.

loading image