Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील १०० दिवसातील अपघातांची संख्या वाचून म्हणाल, तिथून प्रवास 'नको रे बाबा'!

Samriddhi Highway
Samriddhi Highwayesakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते. हा महामार्ग सुरु होऊन आज १०० दिवस झाले आहेत. हा महामार्ग राज्यभरात सर्वात जास्त चर्चेत आहे.

नागपूर ते शिर्डी या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी एक १०० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र या महामार्गावरील अपघातांची संख्या काही कमी झाली नाही.  समृद्धी महामार्गावर १०० दिवसात ९०० अपघात झाले आहेत. यामध्ये ३१ जणांना आपले प्राण गमवावे लागले. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. 

या ९०० अपघातीतल ४६ टक्के अपघात म्हणजे जवळपास ४०० अपघात हे मॅकेनिकल फेल्युअरमुळे झाले आहेत. तर १५ टक्के अपघात हे टायर फुटल्याने किंवा पंचर झाल्यामुळे झाले आहेत. या महामार्गावर गाडीचा वेग आणि गाडीची देखभाल याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अपघात होत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Samriddhi Highway
Raj Thackeray : सोशल मीडियात व्यक्त होणाऱ्यांना 'असं' गप्प करता येईल; ठाकरेंनी सांगितला फॉर्म्युला

राज्य परिवहन विभागाचे उपायुक्त भरत कळसकर म्हणाले, वेगाने वाहन चालवताना वाहन मॅकेनिकली तयार आहे का तपासावे. वाहन तंदुरुस्त नसेल आणि त्याचा अतिवेगाने वापर केला तर टायर फुटण्याचे किंवा टायर पंचर होण्याचे १२ ते १५ टक्के प्रमाण आहे. अनफिट गाड्या १२० च्या स्पिडने चालवल्या तर मॅकेनिकली डिफेक्ट होण्याचे प्रमाण ४६ टक्के आहे. 

Samriddhi Highway
Maharashtra Politics : विधानसभा-लोकसभा निवडणुका एकत्र घेतल्यास भाजप-शिंदेंना फटका बसणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com