राज्यातील 91 टक्के बालकांची आरोग्य तपासणी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 एप्रिल 2018

मुंबई - राज्यात राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत 98.50 टक्के अंगणवाड्यांची, तर त्यातील 90.47 टक्के बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. वर्षातून दोन सत्रांमध्ये ही तपासणी केली जाते.

राज्यामध्ये राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी केली जाते. त्यासाठी 993 पथके कार्यरत आहेत. एप्रिल 2017 ते मार्च 2018 पर्यंत एकूण एक लाख 3 हजार 344 अंगणवाड्या व त्यातील 72 लाख 74 हजार 543 बालकांचे तपासणी उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात माहे एप्रिल ते सप्टेंबर 2017 या कालावधीत 98 हजार 29 (94.86 टक्के) अंगणवाड्यांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 62 लाख 20 हजार 498 (85.51 टक्के) बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. पैकी चार लाख 63 हजार 117 किरकोळ आजारी असलेल्या बालकांना औषधोपचार करण्यात आले आहे.

Web Title: 91 percentage child health checking