Corona Update : राज्यात दिवसभरात ९,३५० कोरोनाबाधितांची नोंद

कालच्या तुलनेत राज्यात कोरोनाच्या संख्येत किंचित वाढ
Maharashtra Corona Update
Maharashtra Corona UpdateSakal Media

मुंबई : राज्यात दिवसभरात कालच्या तुलनेत काही प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिवसभरात ९,३५० रुग्ण आढळून आले असून ३८८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली. (9350 corona victims registered in the state during the day)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात ९,३५० कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून १५,१७६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३८८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या १,३८,३६१ अॅक्टिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत ५६,६९,१७९ एकूण रुग्ण बरे झाले आहेत. तर आजवर १,१४,१५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात ५७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ७१८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १४ जणांचा मृत्यू झाला. मुंबई शहरात सध्या १५,३९० अॅक्टिव्ह रुग्ण असून आजपर्यंत ६,८४,८२५ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच १५,२१६ कोरोनाबाधितांचा आजवर मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com