महिलांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा! आता एसटी बसमध्ये महिलांना सरसकट...| A big announcement in the budget for women! Now women get 50 percent discount in ST bus | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget 2023 :
महिलांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा! आता एसटी बसमध्ये महिलांना सरसकट...

Maharashtra Budget 2023 : महिलांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा! आता एसटी बसमध्ये महिलांना सरसकट...

मुंबई - शिंदे-फडणवीस सरकारने आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्याने त्यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. त्यापाठोपाठ महिलांसाठीही बजेटमध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. (Maharashtra Budget 2023)

महिलांसाठी घोषणा करताना फडणवीस म्हणाले की, महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये सरसकट ५० टक्के सवलत यापुढे देण्यात येणार आहे. तसेच महिला खरेदीदारांना मुद्रांक खरेदीत एक टक्का सवलत देण्यात येणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून ३७ लाख महिलांना उपजिविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

राज्यात ८१ हजार आशा स्वयंसेविकांना साडेतीन हजार गट प्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना सध्या ३५०० मानधन आहे. तर गट प्रवर्तकाला ४७०० रुपये आहे. या मानधनात प्रत्येकी दीड हजार रुपयांची वाढ करण्यात येत असल्याची घोषणा फडणवीसांनी केली.

दरम्यान अंगणवाडी सेविकांचे मानधान १० हजार रुपये तर जुन्या अंगणवाडी सेविांचे मानधन ७२०० रुपये आणि अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ५५०० रुपये करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं.