Jitendra Awhad: 'मविआ'चं महिला शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला; आव्हाड वादात कोश्यारी काय भूमिका घेणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad

Jitendra Awhad: 'मविआ'चं महिला शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला; आव्हाड वादात कोश्यारी काय भूमिका घेणार?

मुंबईः रविवारी रात्री कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देणार असल्याचं ट्विट केलं आहे. आता या वादामध्ये महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उडी घेतलीय. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण, मनिषा कायंदे यांच्यासह काही खासदार आणि महिला लोकप्रनिधी राज्यपालांची भेट घेणार आहेत. काही वेळातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची महिला पदाधिकारी भेट घेणार असून काल रात्री नेमकं काय झालं, हे त्यांना सांगणार आहेत.

दरम्यान, या 40 वर्षीय तक्रारदार महिलेने या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मुंब्रा पोलीस ठाण्यात 40 वर्षीय महिलेने जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.