Congress| काँग्रेस आमदार फुटण्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, जाऊ दे ना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray Comment On Speculations Of Rebel In Congress After Shivsena

काँग्रेस आमदार फुटण्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, जाऊ दे ना...

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा काँग्रेस पक्ष असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अशातच, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नवा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शिवेसना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.(Aaditya Thackeray Comment On Speculations Of Rebel In Congress After Shivsena)

मुंबईतील चंदनवाडीच्या गणपतीच्या दर्शनाला आदित्य ठाकरे गेले असता माध्यामांनी त्यांना घेरले. त्यावेळी काँग्रेस आमदार फुटण्यावर विचारलं असता “जाऊ दे ना, आपण आत्ता जर-तर, अगर-मगरपेक्षा देवाचं दर्शन घेऊ आणि त्या आशीर्वादाने पुढे जाऊ.” अशी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: Ashok Chavan : फडणवीसांच्या भेटीनंतर अशोक चव्हाण तातडीने दिल्लीला जाणार

तसेच, उत्सवाच्या काळात कुणी राजकारण करत असेल तो बालिशपणा आहे. लोकांना हे सगळं दिसत आहे. एवढं राजकारण झालं तर लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल. कोविडच्या दोन वर्षांच्या काळानंतर आता सणवारांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन लोकांना याचा आनंद घेऊ द्यावा असा सल्लाही आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना दिला.

हेही वाचा: पंकजा मुंडे यांना प्रसादरुपी सत्तेत संधी मिळेल का? फडणवीसांच्या गणपतीचे घेतले दर्शन

काँग्रेसचे आमदार फुटणार

काँग्रेसमधील काही आमदार फुटणार असून त्यात काही माजी मंत्र्यांचा समावेश आहे. त्यातील दोन माजी मंत्र्यांना शिंदे सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Aaditya Thackeray Comment On Speculations Of Rebel In Congress After Shivsena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..