Aaditya Thackeray: "दारु पितानाचे फोटो व्हायरल करणार"; निलेश राणेंची आदित्य ठाकरेंना धमकी

ठाकरे-राणे वादाला पुन्हा तोंड
Aaditya Thackeray: "दारु पितानाचे फोटो व्हायरल करणार"; निलेश राणेंची आदित्य ठाकरेंना धमकी

Aaditya Thackeray: ठाकरे आणि राणे वाद जगजाहीर आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनी गेल्या काही दिवसांन आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. उद्धव ठाकरेंची अवस्था ही पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झालीय, पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगायची गरज नाही, अशा शब्दांत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे मोठा वाद निर्णान झाला होता.

त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे ( Minister Narayan Rane, Ex MP Nilesh Rane and MLA Nitesh Rane) यांचा उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मात्र निलेश राणे यांनी ट्विट करत थेट आदित्य ठाकरेंना धमकी दिली आहे.

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हणटं आहे की "आदित्य ठाकरे चे पार्ट्यांमध्ये दारू पितानाचे फोटो जाहीर करणार - श्री पावसकर, आदित्य एरबस कंपनी विसरला आणि कल्टी..." त्यामुळे आता राजकीय वाद पेटण्याची चिन्हं आहेत. राणे- ठाकरे वाद दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. त्यामुळं जर फोटो जाहीर केले तर आदित्य ठाकरे आडचणीत येवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com