आदित्य ठाकरे पोचले थेट नाशिकमधील 'त्या' आदिवासी पाड्यावर अन्..

लोकांच्या अडचणी सोडवणं हे आमचं काम - आदित्य ठाकरे
nashik
nashikesakal
Summary

लोकांच्या अडचणी सोडवणं हे आमचं काम - आदित्य ठाकरे

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नेहमी काहीतरी कारणाने टोलेबाजी सुरु असते. सोशल मिडियावर किंवा इतर अनेक माध्यमांद्वारे ते आपल्या समोर येत असते. मात्र सध्या राज्याचे पर्यावरण मंत्री ठाकरे यांचं एक ट्वीट सोशल मिडियावर (Social media) चांगलचं व्हायरल झालं आहे. यावर अनेकांनी त्यांना कौतुकाची थाप दिली आहे.

या ट्वीटमध्ये फोटो आहे नाशिक येथील एका आदिवासी वस्तीतील गावाचा. आज आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते नाशिकमधील (Nashik) या दुर्गम भागातील शेंद्रीपाडा या आदिवासी लोकसंख्या अधिक असणाऱ्या गावातील एका नदीवरील पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. शेंद्रीपाडा येथील गावकऱ्यांना आतापर्यंत बांबूच्या आधारे बांधलेल्या पूलावरुन जीव मुठीत घेऊन नदी ओलांडावी लागत होती. डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन बांबूंवरुन नदी ओलांडत जाणाऱ्या महिलांचे फोटो पाहून आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर येथील सूत्र फिरली आहेत. अवघ्या तीन महिन्यात गावातील पूलाची आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे, त्यामुळे त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.

दरम्यान आज आदित्य ठाकरे स्वत: त्या पुलाच्या उद्घाटनासाठी हजर झाल्याचं पहायला मिळालं आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे. यात ते म्हणतात, मी सोशल मीडियावर या जागेचा फोटो पाहिला होता. त्यानंतर मी अधिकाऱ्यांना या गावातील समस्या सोडवण्यासंदर्भातील निर्देश दिले. हे निर्देश दिल्यानंतर तीन महिन्यांमध्ये आम्ही या ठिकाणी पूल बांधला आणि गावातील प्रत्येक घरात आता नळाने पाणीपुरवठा केला जात आहे. लोकांच्या अडचणी सोडवणं हे आमचं काम आहे, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान या कामात मदत करणाऱ्या स्थानिक नेत्यांबरोबरच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com